केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेची सोडत २७ फेब्रुवारी रोजी होणार

0
2096
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांची माहिती

शबनम न्युज / पिंपरी

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली, रावेत व बोऱ्हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सोडत दि.२७/०२/२०२१ रोजी सकाळी ११ ते दुपारी १ वा. दरम्यान प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे मा.ना.श्री.प्रकाश जावडेकर, केंद्रीय पर्यावरण मंत्री यांचे शुभहस्ते व मा.ना.श्री.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राष्ट्र तथा पालकमंत्री पुणे जिल्हा यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.महापौर श्रीम.उषा उर्फ माई मनोहर ढोरे या राहतील. विशेष उपस्थिती मा.आमदार श्री.लक्ष्मण जगताप, मा.आमदार श्री.महेश लांडगे तसेच प्रमुख उपस्थिती श्री.श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, श्रीमती. सुप्रिया सुळे, डॉ.श्री.अमोल कोल्हे, मा.आमदार श्री.संग्राम थोपटे, श्री.आण्णा बनसोडे यांची असेल.

 

सदर योजनेस मा.महापालिका सभेने ठराव क्र.५१९, दि.२६/०२/२०२० अन्वये मान्यता दिलेली आहे. या योजनेसाठी दि.१७/०८/२०२० ते १०/१०/२०२० या कालावधीत नागरिकांकडून अर्ज मागविणेत आले आहेत. या योजनेकरिता एकुण ४७८७८ इतके अर्ज प्राप्त झाले असून त्यापैकी ४७७०७ अर्ज पात्र ठरलेले आहेत. सदर प्रकल्पाच्या अंतर्गत चऱ्होली १४४२, रावेत – ९३४ व बोऱ्हाडेवाडी-१२८८ अशा एकुण ३६६४ सदनिकांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. या योजनेकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतर याप्रमाणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार आरक्षण असेल. या योजनेकरिता ३६६४ सदनिकेची निवड यादी व त्याच प्रमाणात प्रतिक्षा यादी तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये सदनिका धारकास प्रथमतः १०% स्वहिस्सा भरावा लागेल. या योजनेची सोडत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या Facebook पेजवर (Link – www.facebook.com/pcmcindia.gov.in) Live व YouTube (Link – www.youtube.com/PCMCINDIA ) द्वारे दाखविण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून उपस्थित न राहता वरील प्रमाणे दिलेल्या लिंकवर जावून ऑनलाईन उपस्थित राहावे, सोडतीचा सविस्तर तपशिल महापालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द करण्यात येईल, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई मनोहर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.