शबनम न्यूज / मावळ
पुणे जिल्हा परिषद पुणे,महिलाबालकल्याण विभाग व सभापती कृषी व पशुसंवर्धन .बाबुराव आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद फंडातून मावळ तालुक्यातील सांगवी,चिखालसे,मोरया अंगणवाडी,वडगाव बाजारपेठ,पंचमुखी अंगणवाडी,मधूबन अंगणवाडी,पाटील वस्ती अंगणवाडी,माळीनगर अंगणवाडी या अंगणवाड्यांना गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर टीव्ही संच चे वाटप सभापती बाबुराव आप्पा वायकर व नगरसेविका पुजाताई वहिले यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी मा.उपसरपंच विशालजी वहिले,पै.सुनीलजी दंडेल,उद्योजक गणेशजी पं ढोरे, गणेशजी गो ढोरे,सोनुभाऊ चव्हाण,adv अक्षयजी रौधळ इत्यादी मान्यवर तसेच अंगणवाडीसेविका उपस्थित होते.
यावेळी बोलत असताना सभापती बाबुराव आप्पा वायकर यांनी माझ्या मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील मुलांच्या स्मार्ट शिक्षणासाठी तसेच शैक्षणिक वाढीसाठी उपयुक्त असणारे साहित्य जिल्हा परिषद पुणे तसेच वायकर यांच्या जि प फंडातून जेवढे उपलब्ध करता येईल त्या साठी कायम प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.