शबनम न्यूज / तळेगाव
नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्टस फौंडेशन यांच्यावतीने मोफत कोरोना लसीकरण नावनोंदणी केंद्राचा शुभारंभ संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वानी आपल्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या संपूर्ण देशात लसीकरणाची मोहीम सुरु झाली व नागरिकांना लसीकरण देण्यास सुरुवात झाली. तळेगाव नागरिकांचे कोरोनापासून बचाव व्हावा या हेतूने नगरसेवक नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्टस फौंडेशन यांच्यावतीने मोफत कोरोना लसीकरण पवना हॉस्पिटल, सोमाटणे व प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे येथे करण्यात येणार आहे. गर्दी टाळण्यासाठी व नागरिकांच्या सोयीसाठी नाव नोंदणी केंद्र भेगडे आळी चौक, तळेगाव दाभाडे येथे उभारण्यात आल्याचे नगरसेवक संतोष भेगडे यांनी सांगितले. नाव नोंदणी झाल्यावर नागरिकांना लसीकरणासाठी पवना हॉस्पिटल येथे जाणे-येणेसाठी मोफत बसची सोया सुद्धा उपलध आहे. भेगडे आळी येथील लसीकरण नाव नोंदणी केंद्र बुधवार दिनांक ०७ एप्रिल २०२१ ते २१ एप्रिल २०२१ पर्यंत सकाळी १० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी नाव नोंदणी केंद्रावर येताना मास्क चा वापर करणे अनिवार्य आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा व आपली व आपल्या कुटुंबाची या जीवघेण्या कोरोना रोगापासून संरक्षण करावे असे आवाहन नगरसेवक संतोष भेगडे यांनी केले.
मोफत कोरोना लसीकरण नावनोंदणी केंद्राचा शुभारंभ नगरसेवक संतोष भेगडे, अरुण माने, दिलीप काका खळदे,आनंददादा भेगडे नगरसेविका संगीताताई शेळके, मंगलताई भेगडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी नगरसेवक संतोष भाऊ भेगडे स्पोर्ट्स फाउंडेशन चे सर्व सभासद उपस्थित होते.