नववी व अकरावी चे विद्यार्थी परीक्षाविना पास – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा निर्णय

0
116

शबनम न्यूज / मुंबई

महाराष्ट्र राज्यातील कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याने अखेर पहिली ते आठवी प्रमाणेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा विना थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी जाहीर केला.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश उशिराने सुरू झाले मागील काही आठवड्यापर्यंत हे प्रवेश सुरू होते यामुळे अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही तसेच नववीच्या विद्यार्थ्यां संदर्भात राज्यातील विविध विभागांकडून माहिती घेऊन वर्गोन्नती देताना त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल त्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येतील या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले जाणार असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.