थेरगाव येथील रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

0
87
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त , स्विकृत नगरसेवक श्री.संदीप काशिनाथ गाडे यांच्या संकल्पनेतून आयोजित थेरगाव येथील महिलांसाठी खास आयोजित भव्य रांगोळी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ थेरगाव , पवार नगर , गल्ली क्रमांक – १ येथे संपन्न झाला .

एकूण तीन विभागात ही स्पर्धा घेण्यात आली त्यात अनुक्रमे – 

पोट्रेट रांगोळी
प्रथम क्रमांक : स्नेहा अक्षय देशपांडे (पेशवाई पैठणी)
द्वितीय क्रमांक : आरती पांचाळ( येवले पैठणी)
तृतीय क्रमांक : जयश्री गुजर ( पैठणी)

ठिपक्यांची रांगोळी
प्रथम क्रमांक : नेहा योगेश टिकले ( पेशवाई पैठणी )
द्वितीय क्रमांक : श्रीदेवी महेश शेरे (येवले पैठणी)
तृतीय क्रमांक : आकांक्षा मोकाशे ( पैठणी )

गालिचा रांगोळी
प्रथम क्रमांक : वैष्णवी बिराजदार ( पेशवाई पैठणी)
द्वितीय क्रमांक : अमृता संदीप टेम्भुरकर ( येवले पैठणी )
तृतीय क्रमांक : अश्विनी सातव (पैठणी )
याशिवाय ,
उत्तेजनार्थ
पूजा राहुल शिंदे
अमृता अभिजित खानविलकर
श्रद्धा स्वप्नील वाघमारे
सुनीता अनिल जानराव
यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले .

या प्रसंगी पिंपरी चिंचवड शहराच्या प्रथम नागरिक , महापौर सौ.उषा (माई) ढोरे , भाजप प्रदेश सदस्य सौ.भारतीताई विनोदे , स्विकृत नगरसेवक बिभीषण चौधरी , शिक्षण मंडळ सभापती नगरसेविका सौ.मानिषाताई पवार , सोनाली ताई संदीप गाडे , विजय भुसारे , सुनील जगताप , विजय ठाकरे , राजू मातेरे , प्रदीप माचेरे , विनोद पाटील , प्रतीक दळवी , लक्ष्मण खांडे , किशोर सकुंडे , निखिल कुऱ्हाडे , ईश्वर मोरे , तानाजी भोसले , गणेश गांधी ,येवले पावुने ,राहुल शिंदे ,प्रतीक गाडे ,मोनीश पाचांळ, ईश्वर मोरे , रेणुका हेगडे , गुलजार भाभी हे मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सोमनाथजी नाडे सर यांनी केले.

यावेळी महापौर म्हणाल्या , ” कोविड च्या ताण-तणावाच्या वातावरणातून बाहेर पडण्यासाठीच मा.आमदार लक्ष्मण भाऊ यांनी वाढदिवसाच्या निमित्त स्पोर्ट्स अँड कल्चरल फेस्टिव्हलची संकल्पना पुढे आणली . स्विकृत नगरसेवक संदीप गाडे यांच्या माध्यमातून थेरगाव मधील महिलांना आपले रांगोळी मधील कलाविष्कार दाखविण्याचे व्यासपीठ मिळाले असून त्याचा महिलांना आत्मविश्वास वाढविण्यासाठी नक्कीच उपयोग होईल .”

याप्रसंगी कोविड प्रतिबंधक उपायांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले .
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्विकृत नगरसेवक श्री.संदीप गाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले .