अखेर आठवडाभरानंतर मा.राज्यमंत्री भेगडे यांनी स्विकारले आ.शेळके यांचे लेखी पत्र

0
3244
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

तळेगाव दाभाडे / शबनम न्युज

सन २०१४ – १९ या कार्यकाळातील १६४२ कोटी ९२ लक्ष रुपयांच्या विकासनिधीची सविस्तरपणे माहिती उपलब्ध करुन देण्याबाबत मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना शनिवार (दि.७) रोजी लेखी पत्र देण्यात आले. माजी राज्यमंत्री भेगडे यांनी सविस्तरपणे माहिती दिल्यावर अभ्यास करता येईल, जनतेची दिशाभूल थांबेल,असे आमदार शेळके म्हणाले.

मागील आठवड्यापासून आमदार सुनिल शेळके हे माजी राज्यमंत्री भेगडे यांना भेटून पत्र देण्यासाठी प्रयत्न करत होते. भेगडे काही दिवस बाहेरगावी व त्यानंतर जिल्हा दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले होते. अखेर शनिवार (दि.७) सकाळी माजी राज्यमंत्री भेगडे यांच्या निवासस्थानी जाऊनही स्विय सहाय्यकांनी पत्र स्वीकारले.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दिलेल्या पत्रात असे नमूद केले की,
रविवार (दि.१) नोव्हेंबर रोजी सन २०१४ ते २०१९ या आपल्या कार्यकाळातील मंजुर व उपलब्ध केलेल्या विकासकामांच्या शीर्षकासह निधीची आकडेवारी लेखी स्वरुपात दिली. सदरहू माहिती यापूर्वीच आपण निवडणुकीच्या काळात जाहीर केल्याने सर्वश्रुत आहे. मी या विकासकामांची माहिती संबंधित शासकीय विभागाकडून गेल्या ६ महिन्यांपासून प्राप्त करीत आहे. परंतु मला प्राप्त झालेली आकडेवारी व आपण प्रसिद्ध केलेल्या निधीच्या आकडेवारीमध्ये तफावत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी १४०० कोटी रुपये निधी उपलब्ध झाल्याचे आपण सांगितले असताना आता १६४२ कोटी ९२ लक्ष रुपयांची आकडेवारी देण्यात आलेली आहे. त्यातच शासकीय अधिकारी व आपल्या आकडेवारीतील तफावतीमुळे तालुक्यातील जनतेमध्ये साशंकता निर्माण झालेली आहे.
तरी आपण प्रसिद्ध केलेल्या प्रत्येक शीर्षकाअंतर्गत गावनिहाय व कामनिहाय माहिती उपलब्ध करुन द्यावी, जेणेकरून तालुक्याच्या विकासाचा अभ्यास करणे सोयीस्कर होईल. तसेच आपण सांगितल्याप्रमाणे जी १०० कोटी रुपयांची विकासकामे रखडलेली आहेत. त्या कामांची देखील शीर्षकासह गावनिहाय व कामनिहाय विस्तृत माहिती उपलब्ध व्हावी. तसेच तळेगाव – चाकण हा राष्ट्रीयमार्ग मंजुर असल्याचे प्रशासकीय मान्यता असलेले पत्रही उपलब्ध व्हावे. त्यानुसार या कामांचा मी पाठपुरावा करुन मावळच्या विकासात भर घालेन. सदरहू विस्तृत माहिती मला लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. आपले मोलाचे असलेले अनुभव आम्हाला ज्ञात असुन ज्या ठिकाणी मला अडचण येईल, त्यावेळी आपले मार्गदर्शन घ्यायला आवडेल. असे आमदार शेळके यांनी पत्रात म्हटले आहे.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous article#PUNE : पुणे विभागातील 4 लाख 78 हजार 330 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
Next article#PUNE : पुणे पदवीधर मतदारसंघात उमेश पाटील यांना मॉक पोलमध्ये 60% पसंती