थेरगाव सर्वांगीण विकास व्याखानमालेत एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या अभ्यासपूर्ण ओघवत्या शैलीतून उलगडला शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजयचा इतिहास

0
48
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / पिंपरी

पिंपरी -= पिंपरी चिंचवड मनपा च्या ग प्रभाग सदस्य .संदीप काशिनाथ गाडे यांच्या संकल्पेतून आयोजित , थेरगाव सर्वांगीण विकास व्याखानमालेत एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांचे शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय या विषयावरील अभ्यासपूर्ण व्याखान संपन्न झाले . थेरगावच्या सर्वांगीण विकास अंतर्गत विविध क्षेत्रातील दिग्गज व्याखात्यांना ह्या व्याख्यानमाले मध्ये आमंत्रित करण्यात येते . शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय या विषयावरील व्याखानमालेचे दुसरे पुष्प गुंफण्यात आले .
यावेळी श्रीहरी तापकीर म्हणाले , थोरल्या शाहू महाराजांनी अहत तंजावर तहत पेशावर पासून ते अफगाणिस्तानातील अटक ते कटक या मराठ्यांच्या साम्राज्य विस्ताराची पायाभरणी शिवछत्रपतींच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये झाली होती . राज्याभिषेकाच्या नंतर अवघे 44000 चौरस किलोमीटर असणारे स्वराज्य दक्षिण दिग्विजय मोहिमेनंतर 110000 चौरस किलोमीटर पर्यंत विस्तारले . या मोहिमेमुळे स्वराज्याचा भूभाग तब्बल चार पट विस्तारला. व दक्षिणेत मराठे आणि कुतुबशाही अश्या दोनच प्रबळ सत्ता प्रस्थापित झाल्या . ह्या मोहिमे दरम्यान शिवरायांनी आदिलशाही खिळखिळी करून , अनेक संस्थाने राज्ये मराठ्यांच्या अधिपत्याखाली आणली . व तब्बल 23 लक्ष होन महसुलाचा प्रदेश स्वराज्याला जोडला गेला . 21 महिने चाललेली मराठ्यांची ही पहिली आणि सर्वांत यशस्वी साम्राज्य विस्तार मोहीम समजली जाते .
शिवछत्रपतीं बद्दल आपल्याला ठराविकच पाने शिकवली जातात . दक्षिण दिग्विजय सारख्या मराठ्यांच्या वैभवशाली पराक्रमाची साक्ष देणाऱ्या मोहिमांवर व्यापक संशोधन होणे गरजेचे आहे , त्यामुळे स्विकृत नगरसेवक संदीप गाडे यांचा ऑनलाईन व्याखानमालेचा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे . असे प्रतिपादन श्रीहरी तापकीर यांनी केले .
या संपूर्ण व्याखानमालेचे संयोजन FourClaps Digital Media Consultancy यांच्या द्वारे करण्यात आले .1900 लोकांनी ऑनलाईन याचा फायदा घेतला

[html5radio radiolink="http://prclive1.listenon.in:9960/" radiotype="shoutcast" bcolor="000000" image="" title="Radio City By Laksh IT Solution 9421719953" artist="Channel:Radio City" facebook="https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-2121477884551705/" twitter="http://twitter.com/"]