शबनम न्युज / भोर
कोरोनाचे वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर शहरात विनामास्क फिरणाऱ्या 135 नागरिकांवर नगरपालिकेने तीन दिवसात 27 हजारांचा दंड वसूल केला.
कोरोना चा प्रादुर्भाव वाढत असल्याने भोर शहरात मास्क लावावे, सुरक्षित अंतर पाळावे म्हणून लोकांना दुकानात, हॉटेल विविध व्यावसायिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे. मात्र, तरीही मास्क न लावता लोक फिरत आहेत. यासाठी भोर नगरपालिकेच्या वतीने चार कर्मचाऱ्यांचे एक पथक असे तीन पथके तयार करून 20 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत 135 लोकांकडून दोनशे रुपये याप्रमाणे सुमारे 27 हजार रुपये दंड वसूल केला आहे.