शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे प्रभाग क्रमांक २ मध्ये मागील काही दिवस लाईट च्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागले नागरिकांच्या या अडचणी ला या प्रभागातील नगर सेवक वसंत बोराटे धावून आले भोसरी विधान सभे चे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाने नगरसेवक वसंतशेठ बोराटे यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून २ महिन्यांपूर्वी विद्युत विभागाकडून सतत पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी मंजुरी घेतली होती यासंदर्भात आज नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यासाठी जागे ची पाहणी करून जागा निश्चित करण्यात आली.
यावेळेस महानगरपालिकेचे अधिकारी लांडे साहेब व भोसले साहेब तसेच महेशदादा
लांडगे यांचे कार्यालयीन प्रतिनिधी ऋषभ खरात उपस्थित होते. यामुळे गायकवाड वस्ती,
इंद्रायणी पार्क, स्वामी समर्थ कॉलनी,गणेश नगर व तुपे वस्ती येथील कायमचा लाईटचा प्रश्न सुटेल. थोड्याच दिवसात हे काम पूर्ण होईल.या विजेच्या अडचणी चे निवारण केल्या बद्दल नागरीकांनी नगर सेवक वसंत बोराटे यांचे भर व्यक्त केले