खडकवासला प्रकल्प संबंधित सर्व कामे तात्काळ पूर्ण करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

0
78
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / मुंबई

मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला प्रकल्प संबंधित आढावा बैठक पार पडली.या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व नियोजित कामांचा आढावा घेतला व सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या बैठकीत उजनी धरणातून पाणी उपसा करून खडकवासला धरणाच्या नवीन मुठा उजव्या कालव्यामध्ये शेटफळ गढे जवळ सोडून त्याद्वारे पुढील भागातील सिंचन पुर्नस्थापित करणे, लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेचे 7200 हेक्टर क्षेत्रासाठी तात्काळ सर्वेक्षण करून योजना कार्यान्वित करणे, इंदापूर तालुक्यातील लाभक्षेत्रासाठी पाणी कमी पडत असल्याने उजनी बॅक वॉटर क्षेत्रामध्ये बॅरेजेस उभारणे, निरा नदीवरील उध्दट व सोमथळी या धर्तीवर खोरोची बेटात नव्याने बॅरेजेस बांधकाम करणे, ही सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी प्रधान सचिव (जलसंपदा), सचिव (लाभक्षेत्र विकास), मुख्य अभियंता (जलसंपदा), मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प), मुख्य अभियंता (जलविज्ञान, नाशिक), महासंचालक, (मेरी, नाशिक), कार्यकारी संचालक (कृष्णा खोरे), उजनी व खडकवासला प्रकल्प संबंधित अधिकारी उपस्थित होते.