चऱ्होली , रावेत व बो-हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पाची संगणकीय सोडत 11 जानेवारी रोजी होणार समाज माध्यमातून – सोनाली गव्हाणे

0
3312
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड

सोडतीचा सविस्तर तपशिल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

पिंपरी, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी, गर्दी टाळण्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने लावण्यात येणाऱ्या चऱ्होली , रावेत व बो-हाडेवाडी येथील पंतप्रधान आवास योजना प्रकल्पाची संगणकीय सोडत 11 जानेवारी रोजी सामाजिक माध्यमातून होणार असल्याची माहिती शहर सुधारणा समिती सभापती प्रा. सोनाली गव्हाणे यांनी दिली

फेसबुक व यूट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने सदर योजनेची सोडत होणार आहे.

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी च-होली, रावेत व बो-हाडेवाडी येथे स्वस्त घरकुल योजना राबविण्यात आलेली असुन सदर नियोजित प्रकल्पांतील सदनिकांची संगणकीय सोडत सोमवार दि.११,जानेवारी २०२१ रोजी दु.३.०० वा. प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे होणार आहे.

सदर प्रकल्पाचा तपशील खालीलप्रमाणे-प्रकल्पाचे नाव च-होली – १४४२,रावेत – ९३४,बो-हाडेवाडी – १२८८ असे एकूण – ३६६४ घरकुल या योजनेची सोडत Facebook Live व You Tube या सामाजिक माध्यमातून करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सोडतीच्या ठिकाणी कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीकोनातून गर्दी करु नये असे आवाहन मा.सभापती- शहर सुधारणा समिती प्रा.सौ.सोनाली दत्तात्रय गव्हाणे यांनी केले आहे. सोडतीचा सविस्तर तपशिल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट www.pcmcindia.gov.in वर व वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

या प्रकल्पाची सोडत मा.उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत, श्री.चंद्रकांत पाटील मा.आमदार तथा माजी महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मा.महापौर श्रीम.उषा उर्फ माई मनोहर ढोरे या असतील.
तसेच विशेष उपस्थिती मा.आमदार श्री.लक्ष्मण जगताप, मा.आमदार श्री.महेश लांडगे तसेच प्रमुख उपस्थिती मा.खासदार श्री.श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, श्रीमती सुप्रिया सुळे, डॉ.श्री.अमोल कोल्हे, मा.आमदार श्री.संग्राम थोपटे, श्री.आण्णा बनसोडे यांची असेल.

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleविमुक्त भटक्या जमाती आघाडी पुणे अध्यक्षपदी राजेश धोत्रे
Next articleडॉ. पतंगराव कदम यांना अभियांत्रिकी महाविद्यालयात अभिवादन