नगरसेविका प्रियांका बारसे यांचा प्रत्यक्ष सुसंवाद व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती*

0
178
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

*गवळीनगर प्रभागात वय वर्षे 45 पुढील नागरिकांच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाने पाच हजाराचा टप्पा केला पार*
.
*नगरसेविका प्रियांका बारसे यांचा प्रत्यक्ष सुसंवाद व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनजागृती*

शबनम न्यूज / पिंपरी चिंचवड

कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने दक्षता घेत आहे, मात्र जेष्ठ नागरिकांसाठी सुरू असलेली लसीकरण मोहिम तळागाळापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न नगरसेविका प्रियांका बारसे व त्यांची महीला ब्रिगेड होम टु होम संवादातून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रभावीपणे करत आहेत.
त्यांच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सुरुवातीला लसीकरणाबाबत अनेक गैरसमज समाजात पसरले होते.भीती पसरली होती ही या भीतीपासून दूर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे जाणून घेऊन सुरुवातीला सर्वात प्रथम नगरसेविका प्रियांका बारसे यांनी स्वतः लस टोचून घेतली आणि नागरिकांना प्रत्यक्ष कृतीतून या लसीपासून कोणताही धोका नाही तर ती सुरक्षित आहे, तुमची प्रतिकार क्षमता ती वाढ होते हे त्यांनी दाखवून दिले.

या कोरोनाच्या काळातही धोका पत्करून पण सुरक्षित अंतर ठेवुन त्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये सहज मिसळुन जातात तर तरूणांमध्ये एक शिक्षिका आणि नगरसेविका यांचा एक सुरेख संगम साधुन त्यांच्या कामाची एक छाप मागे सोडतात.

लसीकरण केंद्रावर काम करणारे आरोग्य कर्मचारी कोरोना योद्धे शिक्षक व इतर सहकारी मित्र परिवार यांची देखील त्या काळजी घेत असतात.

गेल्या पंधरा दिवसातील गवळीनगर प्रभागातील लसीकरणाचा रोजचा आलेख हा नेहमी चढलेलाच दिसून येत आहे. आणि आज तर दुपारी दोन च्या पुढे 5500 चा टप्पा पार झालेला पाहून नगरसेविका बारसे यांना अत्यंत समाधान वाटले. यापुढच्या काळातही ज्येष्ठ नागरिक तरुणवर्गाला कोरोना पासून लांब ठेवण्यासाठी ,जागरूकता निर्माण होण्यासाठी अजून काय करता येईल याबाबत त्यांचे विविध प्रकल्प, उपक्रम डोळ्यासमोर आहेत.

लवकरच गवळीनगर प्रभाग दहा हजाराचा टप्पा गाठेल असा त्यांना विश्वास आहे

[html5radio radiolink="http://prclive1.listenon.in:9960/" radiotype="shoutcast" bcolor="000000" image="" title="Radio City By Laksh IT Solution 9421719953" artist="Channel:Radio City" facebook="https://www.facebook.com/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-2121477884551705/" twitter="http://twitter.com/"]