पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये covid-19 लसीकरण केंद्र सुरू करावे-नगरसेविका सारिका बोऱ्हाडे

0
45
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक दोन मध्ये वयाच्या ४५ वरील नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्यामानाने तेथील परिसरात covid-19 लसीकरण केंद्र कमी आहेत त्यामुळे तेथील नागरिकांना लस घेण्याकरिता घरापासून लांब जावे लागते याकरिता या परिसरात लवकरात लवकर covid-19 लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी करणारे पत्र नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिले आहे.

सदर परिसरात covid-19 लसीकरण केंद्र सुरू करावे येथील नागरिकांना लसीकरणासाठी जनजागृती करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू असेही दिलेल्या निवेदनात नगरसेविका सारिका बोराडे यांनी सांगितले आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी सुचविल्याप्रमाणे प्रभाग क्रमांक दोन येथील परिसरात लवकरात लवकर लसीकरण केंद्राची व्यवस्था करावी जेणे करून वयाच्या 45 वरील जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करणे सोयीस्कर होईल असेही निवेदनात म्हटले आहे.