पार्थ पवार फाऊंडेशन वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत आरोग्य सेवकांचा सन्मान

0
97
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील पार्थ पवार फाऊंडेशन वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत
आरोग्य सेवा गौरव पुरस्कार २०२१ वितरण कार्यक्रम संपन्न झाला.

कोरोना काळात तसेच इतर काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य सेवकांचा सन्मान करण्यात आला या मध्ये विनोद बेंडाळे,रमेश भोसले,उमेश जाधव,दिपक माकर,आनंद कांबळे,रश्मी पूंडलवार,नंदु भालेराव,मोहन साबळे यांना स्मृतीचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी नगर सेवक राजाभाऊ बनसोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आज कोरोनाआजाराने संपूर्ण जगात थैमान घातले असताना आरोग्य कर्मचारी आपले काम सर्व ताकदीने व आपल्या जिवाची पर्वा न करता करतात आपले परिवार घरी असताना तुमच्या आमच्या परिवारासाठी झटत असतात अशा करोना योध्दाचा सन्मान प्रत्यकाने केला पाहिजे.असे सांगितले

या प्रसंगी संयोजक कार्यक्षम नगरसेवक राजाभाऊ बनसोडे गणेश ढमाले अध्यक्ष माथाडी कामगार संघटना यावेळी जेष्ठ नागरिक संघ दापोडी चे जयवंत मोरे,सुभाष शहा उपस्थित होते