नगरसेवक रवि लांडगे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांसाठी मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू

0
167
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्युज / पिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील भाजपचे नगरसेवक रवि लांडगे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांसाठी भोसरी, धावडेवस्ती-अंकुशनगर येथील बाबा आनंद मंगल कार्यालय येथे मोफत कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. व ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी या केंद्रावर येऊन लस घ्यावी, असे आवाहन नगरसेवक रवि लांडगे यांनी केले आहे.

प्रभाग क्रमांक ६ मधील ४५ वर्षांवरील नागरिकांनी या बाबा आनंद मंगल कार्यालयातील लसीकरण केंद्रावर जाऊन कोरोनाची लस घ्यावी. व नागरिकांनी केंद्रावर जाताना आपला मोबाईल आणि आधार कार्ड सोबत घेऊन जावे. तसेच नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन नगरसेवक रवि लांडगे यांनी केले आहे.