संदीप गाडे यांच्या संकल्पनेतून थेरगाव सर्वांगीण विकास व्याखानमाला

0
193
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचे ग प्रभाग सदस्य संदीप गाडे यांच्या संकल्पनेतून थेरगाव सर्वांगीण विकास व्याखानमाला आयोजित करण्यात आली असून शिवछत्रपतींचा दक्षिण दिग्विजय या विषयावर रविवार , दि.११ एप्रिल २०२१ संध्याकाळी ७ वाजता फेसबुक लाईव्ह द्वारे व्याख्यनमाला आयोजित करण्यात येणार आहे
थेरगाव..!! पिंपरी चिंचवड शहराच्या वेगवान विस्ताराचे साक्षीदार आणि महत्त्वाचा दुवा ठरलेले गाव..!! आपले गावपण जपत थेरगावने विविध भागातून आलेल्या नागरिकांना सामावून घेतले . थेरगावची सर्वांगीण प्रगती होत असतानाच विविध विषयांवरील नामवंत लोकांची एक वैचारिक बैठक बसविण्याचा ह्या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल .

थेरगाव मधील सर्व नागरिकांचा या व्याखानमालेस उदंड प्रतिसाद लाभेल असा विश्वद संदीप गाडे यांनी व्यक्त केला आहे.

थेरगाव सर्वांगीण व्याखानमालेचे दुसरे पुष्प आपण गुंफतोय
आपल्या सर्वांचे आराध्य दैवत , महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वाभिमान अर्थात शिवछत्रपती यांच्या चरित्रावर..!!
आपले मान्यवर व्याखाते आहेत पिंपरी-चिंचवड भूषण एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर.
2012 साली जगातील सर्वोच्च अश्या माऊंट एव्हरेस्ट सह हिमायलातील तब्बल 9 शिखरांवर यशस्वी चढाई ही त्यांची कामगिरी विस्मयकारक आहे . गिर्यारोहणासोबतच त्यांची इतिहास संशोधनातील अभिरुची जपली गेली ती दुर्गमहर्षी स्वर्गीय प्रमोद मांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तर चिंचवडचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक भाषा लिपी तज्ञ श्री.ब.हि.चिंचवडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ऐतिहासिक भाषेचा अभ्यास केला . आणि त्यातून चऱ्होली च्या श्रीमंत तापकीर सरदार घराण्याचा अपरिचित इतिहास जगासमोर आला . हे त्यांचे मोठे यश..!!
शिवछत्रपतींच्या अश्या निष्ठावंत सेवकाशी संवाद साधण्याची संधी गमावू नका असे आवाहन संदीप गाडे यांनी केले आहे

रविवार , दि.११ एप्रिल २०२१ संध्याकाळी ७ वाजता
Sandip Kashinath Gade यांच्या अधिकृत फेसबुक पेज वरून Live संवाद
Facebook live link –
https://fb.me/e/1y2vJsCEi
आयोजक
श्री.संदीप काशिनाथ गाडे