शबनम न्युज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील महात्मा फुले नगर मध्ये काही दिवसापूर्वी झाडाची फांदी कोसळून अपघात झाला होता. या पार्श्वभूमीवर या भागातील माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी मुख्य उद्यान अधीक्षक प्रकाश गायकवाड यांच्याकडे जुनी व जीर्ण झालेली धोकादायक झाडे काढून टाकण्याबाबत मागणी केली. परंतु सदर बाबतीत उद्यान विभागाकडे मोठ्या क्रेनची सुविधा नसल्याने ही झाडे छापता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने जितेंद्र ननावरे यांनी आपल्या स्वखर्चाने मोठ्यात क्रेन उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शविली. त्यानुसार मुख्य उद्यान अधीक्षक यांच्या आदेशाने उद्यान विभागाने तातडीने धोकादायक झाडांची पाहणी करत कारवाई करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
प्रभागात नागरिकांच्या अडचणी सोडविण्यावर माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे नेहमीच भर देत असतात नागरिकांच्या मागणीनुसारच महात्मा फुले नगर मधील झाडांच्या फांद्या छाटण्या जितेंद्र ननावरे यांनी पुढाकार घेऊन स्वखर्चाने उद्यान विभागाला मोठ्या क्रेन उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शविल्याने नागरिकांनी त्यांचे आभार व्यक्त केले.