शबनम न्युज / पिंपरी
राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या एमआयडीसी रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल व दुरुस्तीचे काम गुरुवारी (दि.25 ) रोजी करण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत काम सुरू राहणार आहे.
त्यामुळे एमआयडीसीकडून शहरातील पिंपरी चिंचवड, भोसरी, देहू रोड, कासारवाडी, फुगेवाडी, निगडी, सीएमइ,आरअँड डी, एसएसएनएल, तळवडे, चाकण, देहूरोड, कॅन्टोन्मेंट बोर्ड, ओएफडीआर या भागात गुरुवारी दिवसभर बंद राहणार असून, शुक्रवारी (दि. 26) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून जपून वापर करावा, असे आवाहन एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.