- 6/7 आसनी व्हर्जनसाठी सुरूवातीला 14.69 Lakhs रूपयांमध्ये (एक्स-शोरूम दिल्ली) उपलब्ध
- प्रभावशाली अॅडवेन्चर वैशिष्ट्य सादर
शबनम न्युज / मुंबई
टाटा मोटर्स या भारताच्या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रॅण्डने आज त्यांची प्रिमिअम प्रमुख एसयूव्ही नवीन सफारी लाँच केली. सफारीची आकर्षक डिझाइन, अद्वितीय विविधता, आलिशान व आरामदायी इंटीरिअर्स आणि शक्तिशाली कार्यक्षमता आधुनिक एससयूव्ही ग्राहकांच्या आधुनिक, बहुआयामी जीवनशैली गरजांची आणि अभिव्यक्ती व रोमांचसह प्रतिष्ठा व आकर्षकतेच्या परिपूर्ण संयोजनासाठी त्यांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करतात. नवीन सफारी तुमच्या जवळच्या टाटा मोटर्स डिलरशिपमध्ये 6/7 आसनी व्हर्जनसाठी सुरूवातीच्या 14.69 Lakhs रूपये (एक्स-शोरूम दिल्ली) किंमतीमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.
टाटा मोटर्सने प्रभावी व प्रबळ लुकसह सफारीचे ‘अॅडवेन्चर’ वैशिष्ट्य देखील सादर केले. ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसी एसयूव्ही निवडण्यासाठी अधिक पर्याय मिळतात. ॲडवेन्चर वैशिष्ट्य आपल्या देशाच्या वैविध्यपूर्ण नयनरम्य ठिकाणी असलेल्या संपन्न व वैविध्यपूर्ण निसर्गामधून प्रेरित ट्रॉपिकल मिस्ट रंगामध्ये उपलब्ध असेल.
नवीन सफारीच्या सादरीकरणाबाबत बोलताना टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गुएंटर बुत्शेक म्हणाले, “आमची नवीन प्रमुख वेईकल सफारी सूक्ष्मदर्शी व सर्वसमावेशक एसयूव्ही ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करत आहे. ही वेईकल 2020 मध्ये सादर करण्यात आलेल्या कार्स व एसयूव्हीच्या ‘न्यू फॉरेव्हर’ श्रेणीमध्ये अव्वलस्थानी आहे आणि टाटा मोटर्सच्या धोरणात्मक परिवर्तनामधील आणखी एका सुवर्ण टप्प्याला सादर करते. नवीन सफारी झपाट्याने विकसित होत असलेल्या बाजारपेठ विभागांमध्ये उपस्थिती वाढवण्याच्या आमच्या संकल्पाला प्रभावी समर्थन करते. वेईकलचा अपवादात्मक रचना दर्जा व प्रिमिअम फिनिश, शक्ती व कार्यक्षमता ब्रॅण्डच्या प्रतिष्ठित वारसाला पुढे घेऊन जातात आणि ‘न्यू फॉरेव्हर’ श्रेणीची प्रमुख वैशिष्ट्ये सुरक्षा, स्टाइल, ड्रायव्हिंग क्षमता व दर्जात्मक वैशिष्ट्यांना प्रगत करतात. पुन्हा एकदा सफारी भारतीय रस्त्यांवर वर्चस्व प्रस्थापित करेल.”
टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वेईकल्स बिझनेस युनिटचे अध्यक्ष शैलेश चंद्रा म्हणाले, “सफारीने भारतामध्ये एसयूव्ही लाइफस्टाइल सादर केली आणि समकालीन अवतारामध्ये नवीन सफारी आजच्या एसयूव्ही ग्राहकांच्या बहुआयामी जीवनशैलींशी संलग्न आहे. आलिशान इंटीरिअर्स, अत्याधुनिक कनेक्टिव्हीटी आणि प्रिमिअम वैशिष्ट्ये असलेली सफारी आकर्षक दिसण्यासोबत जीवनशैली दर्जाला नव्या उंचीवर घेऊन जाते. ‘अॅडवेन्चर’ वैशिष्ट्याच्या सादरीकरणासह ग्राहकांना ‘रिक्लेम युअर लाइफ’ला अनुसरून त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभणारी सफारी निवडण्याचे अधिक पर्याय उपलब्ध आहेत.”
सफारी अत्यंत वैविध्यपूर्ण असून शहरातील किंवा महामार्गावरील प्रवास असो, दूरच्या प्रवासावर जायचे असो किंवा न पाहिलेल्या ठिकाणी जायचे असो उतम आरामदायी व विश्वसनीय सुविधा देते. शक्तिशाली 2.0 लिटर टर्बोचार्ज कायरोटेक इंजिन आणि 2741 व्हीलबेससह सफारी सिग्नेचर ऑयस्टर व्हाइट इंटीरिअर्स, तसेच अॅशवूड फिनिश डॅशबोर्ड, भव्य पॅनोरॅमिक सनरूफ – व्यापक व विभागातील सर्वोत्तम पॅनोरॅमिक सनरूफ आहे, तसेच 6 व 7 आसनी पर्याय देखील आहे, ज्यामध्ये 8.8 इंच फ्लोटिंग आयलँड इंफोटेन्मेंट सिस्टम असेल.
सर्व टाटा मोटर्स उत्पादनांप्रमाणे सफारीमध्ये सर्व डिस्क ब्रेक्स, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक व 14 कार्यक्षमता असलेले प्रगत ईएसपी अशी विविध सुरक्षिताविषयक वैशिष्ट्ये आहेत. सुधारित आरामदायी राइड देणा-या बॉस मोडसह सफारी ग्राहकांना ऐसपैस जागा देण्यासोबत आरामदायी प्रवासाची खात्री देते. तसेच ही वेईकल डेटोना ग्रे, ट्रॉपिकल मिस्ट व ऑर्कस व्हाइटसह सिग्नेचर रॉयल ब्ल्यू या अतिरिक्त रंगांमध्ये देखील उपलब्ध असेल.
स्टाइल दर्जाला नव्या उंचीवर घेऊन जात नवीनच सादर करण्यात आलेले ‘अडवेन्चर’ वैशिष्ट्य आर 18 ब्लॅक टिंटेड चारकोल ग्रे मशिन अलॉईज आणि ग्रिलमध्ये पियानो ब्लॅक फिनिश, रूफ रेल्स इन्सर्टस, आऊटर डोअर हँडल्ससह बोनेटवर सफारी मस्कट चिन्हासह येईल. इंटीरिअर्समध्ये ‘अॅडवेन्चर’ वैशिष्ट्य सिग्नेचर अर्थी ब्राऊन इंटरिअर्स, एअर वेण्ट्सवरील गडद क्रोम इंटीरिअर असेण्ट्स, नॉब, स्विचेस्, इंनर डोअर हँडल व इन्स्ट्रमेण्ट क्लस्टरसह स्टिअरिंग व्हीलवरील पियानो ब्लॅक इंटीरिअर पॅक, ग्रॅब हँडल्स, फ्लोअर कन्सोल फ्रेम आणि आयपी मिड पॅड फिनिशरसह आलिशान दिसते. नवीन सफारी एक्सईपासून एक्सझेडए+ पर्यंत नऊ व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
नवीन अवतारामध्ये सफारी जगभरातील एसयूव्हीचा सुवर्ण मानक लँड रोव्हरच्या प्रतिष्ठित डीट व्यासपीठामधून संचालित रचना ओएमईजीएआरसीच्या सिद्ध क्षमता असलेल्या टाटा मोटर्स इम्पॅक्ट 2.0 डिझाइनशैलीसह ब्रॅण्डच्या संपन्न वारसाला अधिक पुढे घेऊन जाते. ओएमईजीएआरसी रचनेने हॅरियरच्या यशासह तिची क्षमता सिद्ध केली आहे.
एसयूव्ही देशातील झपाट्याने विकसित होत असलेला पॅसेंजर वेईकल विभाग आहे. नवीन सफारी कंपनीच्या सातत्याने वाढत जाणा-या एसयूव्ही विक्रीच्या माध्यमातून मिळालेल्या गतीला चालना देईल. या गतीमुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदा 20 टक्क्यांची वायटीडी वाढ झाली आहे.
गेल्या आव्हानात्मक वर्षामध्ये टाटा मोटर्सने प्रवासी बाजारपेठेत आकर्षक कामगिरी केली आहे. ऑक्टोबर 2020 पर्यंत दर महिन्याला 23,000 हन अधिक युनिट्सची विक्री केली आहे. तसेच आर्थिक वर्ष 2021 च्या तिस-या तिमाहीमध्ये टाटा मोटर्स पीव्ही व्यवसायाने मागील 33 तिमाहींमधील सर्वोच्च विक्रीची नोंदणी केली. वाढत्या मागणीचे श्रेय कंपनीच्या न्यू फॉरेव्हर तत्त्वांतर्गत गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या बीएस-6 श्रेणीला देता येऊ शकते. न्यू फॉरेव्हर श्रेणीच्या सर्व उत्पादनांसाठी मागणी होताना दिसण्यात आली, ज्यामध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेले प्रिमिअम हॅचबॅक टाटा अल्ट्रोज व बीएस-6 हॅरियरचा समावेश होता.