यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने ‘पराक्रम दिवस’ उत्साहात साजरा

0
69

शबनम न्यूज / पिंपरी

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या  जयंतीनिमित्त देशभर साजरा होणारा ‘पराक्रम  दिवस’ चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट  सायन्स (आयआयएमएस)च्या वतीनेही  उत्साहात   साजरा करण्यात आला. ऑनलाईन पद्धतीने साजऱ्या  केलेल्या या कार्यक्रमात प्रा. अमर गुप्ता यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन चरित्राचा  आढावा मांडला.

 

 

तर संस्थचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी  आपल्या मनोगतात नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून उभा केलेला स्वातंत्र्यलढा, ‘दिल्ली चलो’ आंदोलन यामुळे संपूर्ण देशात स्वातंत्र्यलढ्याला कसा वेग आला याविषयी विस्तृत विवेचन सादर केले. नेतांजींच्या ‘ तुम मुझे खून दो, मै  तुम्हे आझादी दूंगा’ या  प्रेरणादायी आवाहनाला प्रतिसाद देत त्यावेळी युवकांसह नारीशक्तीनीसुद्धा या लढ्यात कसे योगदान दिले याचीही माहिती त्यांनी दिली.

 

 

आजही त्यांचे विचार आणि जीवनकार्य देशातील युवकांसाठी प्रेरणादायी आहे असे सांगत त्यांच्यावरील माहितीपट व पुस्तकांची माहितीही  विद्यार्थ्यांना सांगितली. अतिशय प्रतिकूल परस्थिती असतानाही नेताजींनी कसे देशकार्य केले हे विद्यार्थ्यानी आवर्जून अभ्यासावे असेही त्यांनी सांगितले.