शबनम न्यूज / निगडी
निगडी परिसरातील सर्व नागरिकांना व शाळेच्या मुलांना तसेच व्यापारी यांना निगडी गावातील मेन पुणे मुबंई रोड (क्राॅस) एक बाजूने दुसर्या बाजूस सर्व नागरिकांना जाता येत नसल्यामुळे निगडी गावातील जय ट्रेडर्स या दूकानासमोर अडंर पास( बोगदा) निगडी गावातील जय ट्रेडर्स दूकानासमोर करण्यात येणार आहे.
या कामाची पाहणी करण्यात आली.यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक -राजूभाऊ मिसाळ, नगरसेविका – सुमनताई पवळे,नगरसेवक – शर्मिलाताई बाबर,नगरसेविका – शैलाजाताई मोरे, नगरसेविका – कमलताई घोलप,नगरसेवक – सचिनभाऊ चिखले,नगरसेवक – उत्तमराव केंदळे, नगरसेवक -अमित गावडे पीसीएमसी चे अधिकारी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष – रोहिदास शिवणेकर तसेच निगडी खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष तानाजी काळभोर,कार्याध्यक्ष शंकर (आप्पा) काळभोर,देवस्थानचे सल्लागार शंकरराव ना. काळभोर,विश्वस्त राजेंन्द्र ल.काळभोर,राजेंन्द्र द. काळभोर,रमेंश सो.काळभोर, ,राजेंद्र बाबर,कासार साहेब,विशाल मडके,तसेच पीसीएमसी चे अधिकारी व व्यापारी बंधु उपस्थित होते.
पुढील 15 दिवसात या कामा संदर्भाबाबत निर्णय घेण्यात येईल व हे काम मार्गी लावण्यात येईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सर्वांना सांगितले आहे.