फक्त नऊ दिवसच नको तर आयुष्यभरासाठी प्रत्येक मायमाऊलीला पुजूया…(नवरात्री निमित्ताने विशेष लेख)

0
8
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शर्मिला येवले

शारदीय नवरात्रौत्सवाची  सुरू आहे. स्त्रीशक्तीची उपासना करण्याचे हे नऊ दिवस.शक्ती आणि भक्तीचा संगम असणारे हे नऊ दिवस आपल्या आयुष्यात मांगल्याचे क्षण आणोत हिच सदिच्छा तसेच फक्त नऊ दिवसच नको तर आयुष्यभरासाठी प्रत्येक मायमाऊलीला पुजूया असा संकल्प करू या.
जग आभासी आहे की आपण हेच हल्ली समजेन अस झालंय. आज नवरात्र उत्सव सुरू तर झालं पण सकाळी सकाळी अशी काही बातमी कानावर यावी की आपण खरच नरकात राहतो की पृथ्वी तलावर हेच समजेनासे झालं आहे. गिधाडाचे लचके तोडावे तसे लहान लेकीच्या ओठाचे लचके औरंगाबाद येथे नराधमांने तोडले व बलात्कार करण्याचा प्रयत्न केला.वाह रे पठ्ठ्या हिच तुझी मर्दागी.तू तर कलंक आहेस हे रे समाजासाठी.

 

 

 

 

 

आजपासून नऊ दिवस देवीची पूजा करतील,उपासना करतील,आजूबाजूच्या महिला मुलींना शुभेच्छा देतील पण पुन्हा दहाव्या दिवशी वासनेने वासाळलेल्या नजरा तिच्या देहावरून फिरतील.मग कशासाठी अट्टाहास पुजा करायचा, दर्शनाला जायचा.आहे त्या मायमाऊल्याना,आयाबहिणींकडेच देवी म्हणून बघा म्हणजे फक्त नऊ दिवस उपवास वैगेरे करायची गरज पडणार नाही.
हा खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे का..? की फक्त शिवजयंतीसाठीच आम्ही महाराजाचे मावळे बाकी वेळेस आम्ही गनिम महाराष्ट्रातील आयाबहिणींची अब्रू लुटायला…? नक्की काय..?महाराष्ट्रातील मर्द मावळ्यांनो उत्तर द्या…शिवछ्त्रपतीना आशीर्वाद म्हणून दिलेली तलवार महाराष्ट्र विसरला तर नाही ना..? विसरला असेल तर यावर्षीच्या नवरात्र उत्सवात ती तलवार बाहेर काढून आपल्या महाराष्ट्रातील आयाबहिणींना द्या जर तुमच्यातला पुरूषार्थ नराधमाचा अवतार घेतो तर आता महाराष्ट्रातील आयाबहिणींना होऊ द्या काली चडिंका माता करू द्या या नराधमाचा वध आणि हा महिलासाठी असुरक्षीत झालेला नरक होऊ द्या पुन्हा एकदा स्वर्ग..बागडू द्या,फुलू द्या दिला या पृथ्वीवरच्या स्वर्गात पुन्हा पहिलासारखं मोकळ,स्वच्छंद.

आज प्रत्येक बाप झोपेत सुध्दा घाबरत झोपेत असेल आपली मुलगी आता घरात देखील सुरक्षित आहे की नाही या कल्पनेने त्यामुळे आता तिला बाहेर पाठवायच की नाही ही सुध्दा शंका त्यांच्या मनात घोळावत असेल हे कुणामुळे तर खरतर तुम्हा-आम्हा लोकांमुळे त्याची कारणं ही तशीच आहे म्हणा.आज वास्तवात जगत असताना भुकेलेल्या वासना कदाचित तुम्हा-आम्हाच्यामुळेच तर पडत नाही ना..?? याचा मित्र आला,तिचा मित्र आला,घरातील वडिलांचा मित्र आला त्याच्या सोबत त्यांचा मित्र आला ओळखीचा ना पाळखीचा पण द्या ओळख करून…!!! असे असंख्य प्रश्न आता मनात घर करायला लागले.मी चार भिंती तोडून बाहेर मोकळी वाट करत होती पण ती वाटच आता सुरक्षित आहे का हा प्रश्न माझ्यासारख्या मुलींच्या मनात येतो तर बाकी मुली कुठे राहिल्या.
असो,नवरात्रात जागर करा पण घरातील, आणि आजूबाजूच्या परिसरातील मुली,महिला,तरूणी यांचा.हा जागर करा भवानी मातेच्या तलवारीच्या शिकवणीचा,हा जागर करा माँसाहेब जिजाऊच्या शिकवणीचा,हा जागर करा शिवछ्त्रपतीच्या शिकवणीचा,हा जागर करा रूद्रशंभोच्या आदर्शाचा,हा जागर करा सावित्री-अहिल्या-रमाबाईच्या त्यागाचा कारण हाच जागर करत महिला,तरूणी,मुली लढताय-भांडताय त्याच्या हक्कासाठी.त्यामुळे फक्त नऊ दिवस नको तर आयुष्यभर नवरात्र साजरी करू या.