मुंबई / शबनम न्यूज
चित्रपट अभिनेत्री पायल घोषने सोमवार दि. २६ रोजी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या रिपलब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) (आरपीआय) पक्षामध्ये प्रवेश केला. तिने मुंबईमध्ये आठवलेंच्या उपस्थितीत रिपाइंचा झेंडा हाती घेतला.
सूत्रांच्या माहितीनुसार, पायलला पक्षाच्या महिला विंगचे उपाध्यक्ष बनवण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून चर्चा होती की, पायल आठवलेंच्या पक्षात प्रवेश करू शकते. सोमवारी या चर्चांना पूर्णविराम मिळाला.
…