पिंपरी / शबनम न्यूज
KSB चौकातील कै. अण्णासाहेब पाटील पुतळा हा बीआरटी रस्ता मार्गात येत असल्याने त्या ठिकाणी असलेल्या नजिकच्या जागेत पुतळ्याचे स्थलांतरण करुन तेथे सुशोभिकरण करण्यात येत आहे. सदर कामासाठी साधारण १ कोटी ७२ लाख रुपयांचा विकास निधी उपलब्ध करुन दिला असून सुशोभिकरणामुळे KSB चौकच्या सौंदर्यात भर पडणार आहे. याचे भूमिपूजन आज गुरुवार दि. २९ , ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता नरेंद्र अण्णासाहेब पाटील अध्यक्ष अण्णसाहेब पाटील महामंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले, याप्रसंगी महापौर माई ढोरे पक्षनेते नामदेव ढाके, उपमहापौर तुषार जी हिंगे, भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे नगरसेविका मंगलाताई कदम, नगरसेवक केशव घोळवे कामगार नेते यशवंत भोसले, मा भैय्या लांडगे ,कामगार नेते मा कैलास जी कदम, श्री अनुप मोरे, शिवसेना शहर अध्यक्ष योगेश बाबर, श्री दातीर पाटील, मनपा अधिकारी श्री सवने परेश मोरे, प्रविण जाधव, सर्जेराव कचरे,पांडुरंग कदम,सतीश कंठाळे,गोरक्ष दुबाले, आबा मांढरे तसेच अनेक कामगार व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ पार पडला.