दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदाने… उत्साहाने… सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधन नियमांचे पालन करुन साजरा करुया – अजित पवार
मुंबई / शबनम न्युज
अज्ञानावरील ज्ञानाच्या, अन्यायावरील न्यायाच्या, असत्यावर सत्याच्या, दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तीच्या विजयाचा हा उत्सव सर्वांनी आनंदाने, उत्साहाने, सोशल डिस्टन्सिंग व कोरोनाप्रतिबंधन नियमांचे पालन करुन साजरा करुया, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
दसरा हा आनंदाचा, उत्साहाचा सण आहे. ‘दसरा सण मोठा… नाही आनंदाला तोटा…’ असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्यासाठी जुने वाद-विवाद, भांडण-तंटे विसरुन प्रेमाचे, स्नेहाचे, चांगल्या विचारांचे आदानप्रदान करण्याचा हा सण आहे. आज दसऱ्याच्या निमित्ताने वाईट विचारांना तिलांजली देऊया… असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
दसऱ्याच्या निमित्ताने सर्वांच्या घरात धनधान्याची आणि मनात चांगल्या विचारांची समृद्धी यावी. राज्यातून, देशातून, जगातून कोरोना संकटाचे उच्चाटन व्हावे, अशा शुभेच्छाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.