माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीमेचा टाकवे बुद्रुक मध्ये दुसरा टप्पा पडला पार
टाकवे बुद्रुक / शबनम न्यूज
माझे कुटुंब माझे जबाबदारी या राज्य शासनाच्या आरोग्य मोहिमेचा टाकवे बुद्रुक मध्ये दुसरा टप्पा नुकताच पार पडला. ग्रामपंचायत हद्दीतील टाकळी या गावातील १ हजार, २ कुटुंबातील, ४४२६ नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये संशयित आढळलेल्या पाच नागरिकांचे स्वब घेण्यात आले. यामध्ये कोणीही पॉजिटीव्ह आढळले नाहीत.
या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी अधिकारी सुवर्णा आरोटे, ग्राम विकास अधिकारी सुभाष बांगर अंगणवाडी सुपरवायझर जुलेखा शेख, मुख्याध्यापक बाळासाहेब उभे, किरण हेंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक, अंगणवाडी सेविका ,आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या सहकार्याने सर्वेक्षण यशस्वी करण्यात आले.