#PUNE : फादर स्टॅन स्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ सत्याग्रह आंदोलन

0
4
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पुणे / शबनम न्यूज

भीमा कोरेगाव – एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेले झारखंड येथील फादर स्टॅन स्वामी यांच्या अटकेच्या निषेधार्थ समस्त ख्रिस्ती बांधव पुणे शहर , रिजनल ख्रिश्चन सोसायटी व रिपब्लिकन युवा मोर्चा यांचे वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.

 

 

 

 

 

 

नक्षलवादाच्या आरोपातून ख्रिस्ती धर्मगुरूची अटक अत्यंत निषेधार्ह असून केंद्र सरकार याद्वारे ख्रिस्टि विरोधी अजेंडा राष्ट्रीय तपास यंत्रणा यांच्या मार्फत राबवत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. फादर स्टॅन स्वामी हे समाजामध्ये व इतर मानवी समाजसेवा करणाऱ्या समूहामध्ये अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध आहेत. कोरोना कालावधीमध्ये 83 व्या वर्षी त्यांची अटक होणे ही केवळ ख्रिस्ती मिशनऱ्यांना बदनाम करण्याची सरकारची योजना असल्याने ती त्यांनी थांबवायला हवी. तसेच स्टॅन स्वामी यांची तात्काळ मुक्तता करावी अशी मागणीही आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे.

सदर आंदोलनाचे निवेदन शिष्टमंडळात द्वारे पुणे जिल्हाधिकारी श्री राजेंद्र देशमुख साहेब यांना देण्यात आले आहे.