#PIMPRI : भुमकर चौक, ताथवडे, शिवार वस्ती मार्गे मारुंजी कडे जाणारा रस्ता दुरुस्त करावा

0
90

पिंपरी / शबनम न्युज

पिंपरी-चिंचवड शहरातील भुमकर चौक ताथवडे पासून शिवार वस्ती मार्गे मारुंजी गावाकडे जाणारा रस्ता हा रहदारीसाठी वाहतुकीसाठी धोकादायक ठरला आहे. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरून वाहतूक धारकांना मोठी कसरत करून जावे लागत आहे. तसेच या परिसरात राहणारे स्थानिक यांनाही या रस्त्यावर चालणे, वाहतूक गाडी चालविणे मोठ्या जिकरीचे झाले आहे.

संपूर्ण रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून चिखल पाण्याने भरून भरलेले खड्डे रहदारीला अडथळा निर्माण करीत आहे. या रस्त्यावर कॉलेज, शाळा, महाविद्यालय असून या रस्त्यावरून विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग व व्यावसायिक यांचा राबता कायम असतो. त्यामुळे सदर रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सदर रस्ता हा इंदिरा कॉलेज पासून शिवार वस्ती मार्गे मारुंजी गावाकडे जातो. मारुंजी गावालगत वेलकम स्कुल, इंदिरा कॉलेज, अशा अनेक शैक्षणिक संस्था या मार्गावर आहेत. त्यामुळे सदर रस्ता हा त्वरित दुरुस्त करावा, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.