अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी आमदार सुनील शेळके यांनी दिला दहा लाख चा धनादेश

0
194

शबनम न्यूज / मावळ

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी सध्या देशभरातून निधी संकलन सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटक या प्रभू श्रीराम मंदिर निर्माणासाठी योगदान देत आहे. सोशल मीडियावर या बाबत पोस्ट केल्या जात आहेत. अनेक सेलिब्रिटी, मान्यवर आणि राजकीय नेतेही यात मागे नाहीत.
मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी देखील श्रीराम मंदिर निर्माणासाठी आर्थिक मदत केली आहे. त्यांनी दहा लक्ष रुपयांचा धनादेश श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांच्यावतीने जिल्हा संयोजक प्रदीप देसाई यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
आमदार सुनिल शेळके यांनी फेसबुक वर ही माहिती दिली आहे. ते म्हणतात, ‘आज संपूर्ण जगभरातून प्रत्येकजण अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माणासाठी निधी संकलन करून यथाशक्ती योगदान देत आहे. या पुण्य यज्ञात दहा लक्ष रुपये समर्पित करून मला सुद्धा या पवित्र कार्यात सहभागी होण्याचे भाग्य मिळाले याचा अभिमान आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, विश्व हिंदू परिषद कार्याध्यक्ष धनाजीराव शिंदे, सहसंयोजक निधी अभियान संतोषभाऊ भेगडे पाटील, राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दीपक हुलावळे, पुणे जिल्हा निधीप्रमुख रमेश लोणकर, अध्यक्ष बजरंग दल मावळ गोपीचंद महाराज कचरे, बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, जिल्हा मंत्री अमित भेगडे, महेंद्र असवले, अमोल पगडे व इतर मान्यवर उपस्थित होते.