शबनम न्यूज
मुंबई-राज्यातील शाळांमधील इयत्ता पाचवी ते आठवी चे वर्ग येत्या 27 जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिले यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.
सारे शिक्षण विभागाच्या विजन 2025 चे सादरीकरण मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत करण्यात आले शाळा 27 जानेवारीपासून सुरू करण्याचा प्रस्ताव विभागाने मुख्यमंत्र्यांकडे दिलेला होता त्याला मान्यता देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले.