पिंपरी चिंचवड / शबनम न्यूज
पिंपरी चिंचवड – पिंपरी-चिंचवड मनपाच्या वतीने नगरविकास विभागाकडे हिंजवडी, मान ,मारुंजी, गहुंजे नेरे, सांगवडे, जांबे या पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रा लगत असलेल्या गावांचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मंजुरीकरिता शासनास सादर केलेला आहे, देशात आयटी क्षेत्रात नामांकित असलेले हिंजवडी हब व गहुंजे येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट ग्राउंड परिसराचा विकास होत असताना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणावर अपयश येत असल्याने वाढत्या लोकसंख्येमुळे सदर परिसरातला बकालपणा आला आहे.
सदर गावातील ग्रामपंचायती निधीअभावी सार्वजनिक सेवा सुविधा देण्यास असमर्थ ठरत असल्याने कचरा ,पाणीपुरवठा ,रस्ते, पथदिवे असे प्रश्न या भागात मोठ्या प्रमाणात भेडसावत असून या गावांचा सर्वांगीण विकास नियोजनबद्ध होणे आवश्यक असल्याने सदर गावांचा पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात समावेश झाल्यास सदर गावांचा विकास होणे सोयीचे होईल असे सांगत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे मागणी केली होती या मागणीला यश आले असून महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत आमदार लक्ष्मण जगताप यांना पत्राद्वारे कळविण्यात आले आहे की पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये अकरा गावे समाविष्ट करण्याच्या अनुषंगाने आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचा प्रस्ताव दाखल झालेला आहे प्रस्तुत प्रकरणी पुढील कारवाई करण्याच्या दृष्टीकोनातून विभागीय आयुक्त पुणे विभाग ,पुणे यांचे अभिप्राय मागविण्यात आलेले आहे सदर अभिप्राय प्राप्त झाल्यावरच या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल. आता लवकरच पिंपरी चिंचवड शहरालगतची गावे ही मनपा हद्दीमध्ये समाविष्ट होणार असून आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे या गावांचा लवकरच पिंपरी चिंचवड मनपा हद्दीत समावेश होणार आहे.