PIMPRI NEWS : मनपा कल्याणकारी अर्ज स्वीकृत इस 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

0
163
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली माहिती

शबनम न्यूज / पिंपरी

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने महिला व बालकल्याण मागासवर्गीय दिव्यांग कल्याणकारी व इतर विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात त्यासाठी अर्ज स्वीकृती करीता 25 नोव्हेंबर पर्यंत एक महिन्याची मुदत होती त्याला आता 24 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे व सत्तारूढ पक्ष नेते नामदेव ढाके यांनी शुक्रवारी दिली,

लॉक डाउन मुळे अनेकांना आवश्यक कागदपत्रे जमा करता आली नाही किंवा उपलब्ध झाली नाही त्यामुळे कल्याणकारी योजनांच्या अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ देण्याची मागणी नगरसेवकां ची पदाधिकाऱ्यांनी केली होती त्यामुळे अर्ज स्वीकृस 24 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज वाटप आणि स्वीकृती शहरातील सर्व नागरी सुविधा केंद्रामध्ये सकाळी अकरा ते दुपारी 4 या वेळेत सुरू आहे, अर्ज मोफत आहेत, अर्ज भरून दिल्यानंतर वीस रुपये शुल्क आहे या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापौर उषा उर्फ ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे