HINJEWADI NEWS : ठेकेदाराचा खून करणाऱ्यास अटक

0
170
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

शबनम न्यूज / हिंजवडी

हिंजवडी : ठेकेदाराने छटपूजेसाठी सुट्टी दिली नाही म्हणून त्याचा खून करणाऱ्या आरोपीला हिंजवडी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतले, अरविंद नेपाल चव्हाण उर्फ यादव ( वय 35 मूळ रा. देवरी कलान, ता. मडीहान,जि. मिर्झापूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे.

गणपत सदाशिव सांगळे ( वय 24, रा. जांभे, ता. मुळशी) यांचा 24 ते 27 नोव्हेंबर दरम्यान खून झाल्याचे निष्पन्न झाले होते. दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी घर मालक सुरेश मोहिते यांच्यासोबत घराची पाहणी केली या ठेकेदारा सोबत राहणाऱ्या अरविंद चव्हाण याने खून केल्या ची माहिती प्राथमिक तपासात समोर आली, त्यानुसार चव्हाणाचा पोलिसांनी शोध सुरू केला असता तो आपल्या मूळ गावी गेल्याचे समजले त्यानुसार हिंजवडी पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात गेले या पथकाने तब्बल दोन हजार किलोमीटरचा प्रवास केला स्थानिक पोलिसांच्या मदतीने नक्षलग्रस्त व जंगल परिसरातून प्रवास केला, वेशांतर करून आरोपी चा पत्ता शोधून काढला ,आरोपी पत्नीसह तेथूनही पळून जाण्याच्या तयारीत होता, तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक नंदराज गभाले, पोलीस अंमलदार बंडू मारणे, महेश सुभाष गुरव, नूतन कोंडे ,झनक गुमलाडू यांच्या पथकाने ही कारवाई केली .