हा विजय आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक- अजित पवार

0
63
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

मुंबई / शबनम न्यूज

महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिनंदन;मतदारांचे मानले आभार

मुंबई, दि. ४ डिसेंबर – महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा विजय हा आघाडीतील सर्व पक्षांच्या एकजूटीचा व राज्यातील जनतेच्या सरकारवरील विश्वासाचं प्रतिक असल्याचे सांगून, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी केल्याबद्दल सर्व मतदारांचे, राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड हे ४९ हजार मताधिक्क्याने, औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतिश चव्हाण हे ५८ हजार मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन्ही उमेदवारांचे अभिनंदन केले आहे.

महाविकास आघाडीचे अन्य उमेदवारही आघाडीवर असून त्यांचा विजयही लवकरच जाहीर होईल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.