#PUNE : एक वर्षाच्या फरार आरोपीस स्वारगेट पोलिसांकडून अटक

0
4
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पुणे / शबनम न्यूज

एक वर्षापासून फरार असलेला आरोपी स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केला आहे. त्याच्यावर विनयभंग व हाणामारीचे गुन्हे दाखल होते. गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता. सुलतान करीम शेख असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

 

 

 

 

 

 

स्वारगेट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक जायभाय, पोलीस शिपाई ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, विजय कुंभार, शंकर गायकवाड हे गस्त घालत होते. तेव्हा त्यांना ज्ञाना बडे, मनोज भोकरे यांना एक वर्षांपासून फरार असलेल्या आरोपी इंदिरानगर येथील समाज मंदिरात येणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले.

सदर कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी, पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.