#CRIME : दिघी रोड भोसरी मध्ये दोन लाख 26 हजार 800 रुपयांची चोरी

0
7

शबनम न्यूज : ०६ ऑग. (प्रतिनिधी) भोसरी :-  दिघी रोड भोसरी येथे एका सदनिकेत चोरी करत अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 26 हजार 800 रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना 20 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत राधानगरी हाउसिंग सोसायटी दिघी रोड भोसरी येथे घडली.

 

 

 

 

कमल दिगंबर धोत्रे यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी कमल दिगंबर धोत्रे यांचे घर 20 जुलैपासून 1 ऑगस्टपर्यंत कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचे लॉक तोडून आत प्रवेश केला व दोन लाख 26 हजार 800 रुपयांचे दागिने चोरून नेले. याबाबत अधिक तपास भोसरी पोलिस करत आहेत.

 

 शबनम न्यूज च्या नवनवीन बातम्या मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा, (@Shabnamnews) त्याकरिता येथे क्लिक करा.