अभिनेता समीर शर्मा याची गळफास घेऊन आत्महत्या
शबनम न्यूज : ०६ ऑग. (प्रतिनिधी) मुंबई :- टीव्ही अभिनेता व मॉडेल समीर शर्मा याने मुंबईतील मालाड इथल्या राहत्या घरी आत्महत्या केली. ४४ वर्षीय समीरने गळफास घेऊन आत्महत्या केली. समीरच्या घरातून कोणतीच सुसाइट नोट मिळालेली नाही. समीरने बऱ्याच हिंदी मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. ‘ज्योती’, ‘कहानी घर घर की’, ‘लेफ्ट राइट लेफ्ट’, ‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकांमध्ये समीरने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या.
नाइट ड्युटीवर असलेल्या इमारतीच्या वॉचमनने आधी समीरचा मृतदेह पाहिला. त्यानंतर त्याने पोलिसांना व सोसायटीच्या सदस्यांना याविषयीची माहिती दिली. समीरने दोन दिवसांपूर्वीच आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.