#PUNE : राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदे तर्फे रविवारी ऑनलाइन कविसंमेलनाचे आयोजन

0
1
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पुणे / शबनम न्युज

कोरोना महामारीतील लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष कार्यक्रम घेणे शक्य नसल्याने राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व नवागंध संस्थेच्या वतीने “काव्यपंढरी” या ऑनलाइन  कविसंमेलनाचे आयोजन रविवार, दि.१८ आॅक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.  https://youtu.be/IdOzqabGnJY या युट्युब लिंकवर हा ऑनलाइन  कविसंमेलनाचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे, असे आवाहन राष्ट्रीय बंधुता काव्य मंचचे अध्यक्ष कवी चंद्रकांत धस व नवागंधच्या संचालिका सीमा गांधी यांनी काव्य रसिकांना केले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन प्रा. चंद्रकांत वानखेडे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी बंधुताचे संस्थापक प्रकाश रोकडे असतील. डॉ. अशोककुमार  पगारिया प्रमुख पाहुणे असतील. कार्यक्रमाचे संयोजन कवयित्री मीना शिंदे व कवी चंद्रकांत धस यांनी केले आहे. कविसंमेलनामध्ये कवी शंकर आथरे, शिवाजी चाळक, डॉ. भीम गायकवाड, मधूश्री ओव्हाळ, दत्तू ठोकळे, रंजना बोरा,  पितांबर लोहार, संतोष घुले, संगीता झिंजूरके, देवेंद्र गावंडे आदी मान्यवर कवी सहभागी होणार आहेत. सुत्रसंचालन सीमा गांधी करणार आहेत.

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद ही संस्था बंधुता काव्य मंच च्या माध्यमातून गेले वीस वर्ष “काव्यपंढरी” हा उपक्रम राबवीत आहे. या अंतर्गत “धर्म मैत्री अभियान” सुद्धा संस्थेतर्फे राबवले जाते. तसेच संस्थेने आतापर्यंत २१ राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलने घेतली आहेत असे चंद्रकांत धस यांनी कळवले आहे.