#PIMPRI : शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधनाने व बौध्दिक संपदेने देश महासत्ता होईल – ज्ञानेश्वर लांडगे

0
1
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

एस. बी. पाटील शाळेत जागतिक विद्यार्थी दिन साजरा  

पिंपरी / शबनम न्युज

भारत देश एकविसाव्या शतकात महासत्ता व्हावा अशी माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे धोरण होते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी डॉ. कलाम यांनी सांगितलेल्या शिक्षण, तंत्रज्ञान आणि संशोधन या मार्गाने विद्यार्थांनी बौध्दिक संपदा प्राप्त करावी. घेतलेल्या शिक्षणाचा व संशोधनाचा उपयोग देशातील, विशेषता ग्रामिण दुर्गम भागातील दुर्लक्षित घटकाला कमी खर्चात झाला पाहिजे. तसेच शेतकरी, कामगार यांच्यासह वाड्या, वस्त्यांवरील, आदिवासींना देखील या तंत्रज्ञानाचा लाभ घेता आला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत तरच भारत देश महासत्ता होईल असे प्रतिपादन पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी केले.

 

 

 

 

 

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस.बी.पाटील पब्लिक स्कूल मध्ये माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘जागतिक विद्यार्थी दिन’ या कार्यक्रमाचे ऑनलाईन व ऑफ लाईन आयोजन करण्यात आले होते. यावेळी लांडगे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते. पीसीईटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी, पर्यवेक्षिका पद्मावती बंडा, शुभांगी कुलकर्णी व सहभागी शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
डॉ. कलाम यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. डॉ. कलाम यांनी शिक्षकांसाठी लिहिलेली प्रतिज्ञा डॉ. सैनी यांनी वाचली. शिक्षिका प्रिया पराजित यांनी जागतिक विद्यार्थी दिनाचे महत्व विषद केले. प्राथमिक विभागाच्या विद्यार्थी व शिक्षकांनी देशभक्ती गीते सादर केली. यामध्ये संगित शिक्षिका सुलोचना पवार, कुलदिप घाडगे, प्रथमेश इनामदार यांनी मार्गदर्शन केले. डॉ. कलाम यांच्या ‘जीवन प्रवास व इंडियन मिसाईल टेक्नॉलॉजी’ यावर शिक्षिका सपना पगार व नीरु मलिक यांनी पावर पॉईंटचे सादरीकरण केले.

डॉ. कलाम यांचा जीवनपट नृत्य, नाटिका आणि पावर पॉईंट प्रेझेंटेशनने विद्यार्थांपुढे सादर करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनात तृप्ती ब्रिजवासी, योगिता देशमुख, सुचिता फुलारी, पायल निहलानी, नयना तारु, नेहा दोंदे, पद्मावती बंडा, शुभांगी कुलकर्णी, स्वालेहा मुजावर, सुलोचना पवार, कुलदीप धाडगे, प्रथमेश इनामदार, अभिजीत गायकवाड, रीचा अरोरा, रोहित सरकार, धनाजी पाटील, संजय विसपुते, दिपिका कण्णव, रोहिणी कणके आदींनी सहभाग घेतला. फेसबुस लाईव्ह व गुगल मीटव्दारे विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला.