#MAVAL : मावळमध्ये कोरोनाचे प्रमाण झाले कमी ; अजित पवार यांनी प्रशासनाचे मानले आभार

0
1

शबनम न्युज : १६ ऑक्टो.(प्रतिनिधी) पुणे :- पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व कार्यवाही याबाबतची आढावा बैठक महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मावळ तालुक्यात नव्या कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत असून, कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. ही समाधानकारक बाब असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. याबद्दल अजित पवार यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.

 

 

 

 

 

महात्मा फुले जन आरोग्य योजना खाजगी रुग्णालयात प्रत्यक्षात राबविताना तांत्रिक अडचणी येत आहेत. या योजनेमुळे सर्वसामान्य कुटुंबाला दिलासा मिळत असला तरी काही किरकोळ अडचणींमुळे या योजनेत सहभागी नसलेल्या रुग्णांना आर्थिक भार सोसावा लागत आहे. त्यामुळे नियमावलीत काही आवश्यक बदल केले तर सर्वसामान्य कुटुंबाला या योजनेचा अधिक लाभ घेता येईल.

‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत पर्यटन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे प्रदीर्घ कालावधी नंतर मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. त्यामुळे साहजिकच पर्यटकांचा ओघ मावळ तालुक्यात वाढणार आहे. पर्यटन सुरू असताना पर्यटकांनी सरकारने दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे, तसेच भविष्यात गर्दी वाढली तर वाहतुकीसह कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणेवर ताण येऊ शकतो. मावळमध्ये पोलिस यंत्रणकडे अपुरे मनुष्यबळ असल्याने पुढील विचार करता अधिक मनुष्यबळ मिळावे, अशी मागणी यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली.