शबनम न्युज / पुणे
गेली दोन महिन्यांपासून गणराज हाऊसिंग सोसायटीतील नागरिकांची दूषित पाण्याचे तक्रार होती वाश आऊट ,अनेक अधिकाऱ्यांच्या भेटी, प्लंबर ने दुरूस्तीचे काम केले.
पाणी चेकिंग करणाऱ्यांनी पाणी शुद्ध असल्याचा दाखला दिला. पण डोळ्यांना मात्र ते पाणी पिवळसर आणि दुर्गंधी असणारे होते .
अनेक प्रयत्न अजून ठिकाणी दूषित पाणी येण्याचे बंद झाले नाही. नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर यामुळे आला होता .
अखेर पाणीपुरवठा विभागाला ही लाईन गेल्या पंधरा वर्षांपूर्वीची असून याठिकाणी नवीन पाण्याची लाईन टाकून देण्यासंदर्भात प्रस्ताव एक महीन्यापुर्वी नगरसेविका प्रियांका बारसे यांनी पाणीपुरवठा विभागाला दिला.
पाणिपुरवठा विभागाचे अभियंते लाडेसर यांनी नुकतेच प्रोजेक्ट मॅनेजर ,अमृतयोजना यांना त्वरीत येथे नविनलाईन टाकण्याचे कामास सुरूवात करण्याचे लेखी आदेश दिला आहे.
लवकरच गणराज हाऊसिंग सोसायटीमध्ये पाण्याची नविन लाईन टाकण्याचे काम चालु होईल अशी माहीती नगरसेविका प्रियांका बारसे यांनी दिली.