पिंपरी-चिंचवड शहरातील वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देणार : आमदार अण्णा बनसोडे

0
137
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

मुंबई ।  शबनम न्यूज

सध्या पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आली असली तरी ब्रिटन वरून आलेला नवीन कोरोनाचा ट्रेंडमुळे सध्या सर्वच देशांमध्ये दहशत पसरली आहे. महाराष्ट्रातही नव्या कोरोनाचे 8 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी एक रुग्ण पुण्यात आढळला असून, सध्या त्याचे ट्रेसिंग चालू आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर आज पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन या संदर्भात शहरातील खबरदारीच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा केली. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे सूतोवाचही आमदार बनसोडे यांनी केले. शहराची ओळख ही उद्योगनगरी आहे. येथे कामगार वर्ग जास्त आहे. त्यात लॉकडाऊनमुळे आधीच जनता त्रस्त आहे. शहरातील आरोग्य व्यवस्था अजून सक्षम कशी करता येईल ह्यासाठी आरोग्य मंत्री यांची भेट घेतली असे अण्णा बनसोडे ह्यांनी महाराष्ट्र 24 शी बोलतांना सांगितले.

 

 

 

नवीन कोरोनाचा प्रादुर्भावाची वाढ औद्योगिक नगरीत व्हायला नको. यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाची व्यवस्था सुसज्ज करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्नशील असल्याचेही आमदार बनसोडे यांनी स्पष्ट केले. गेल्या 9 महिन्यांपासून जनता त्रस्त आहे. यामुळे वायसीएममधील अतिदक्षता विभागातील बेडच्या संख्येत वाढ करण्यावर भर देणार असल्याचीही चर्चा आरोग्य मंत्र्यांशी झाल्याचे समजते. त्याचप्रमाणे इतर वैद्यकीय सुविधा वाढवण्यावर देखील लक्ष देणार असल्याचे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी दिले आहे.