मुंबईतील वरळीत महिलेची प्रियकराकडून गळा आवळून हत्या, चाकूने चेहऱ्यावरही वार

0
146
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

मुंबईतील वरळी परिसरात एका महिलेची तिच्या प्रियकरांने गळा आवळून हत्या केली. त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या चेहऱ्यावरही वार केले. संबंधित महिला आणि आरोपी अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप राहत होते.

मुंबई / शबनम न्यूज

मुंबई : मुंबईतील वरळी परिसरात राहणाऱ्या एका 44 वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने हत्या केली. प्रियकराने ओढणीने गळा आवळून तिचा खून केला. यानंतर आरोपीने तिच्या चेहऱ्यावर धारदार चाकून वार करत तिचा चेहराही बिघडवला.

सीखा मंडल असं या मृत महिलेचं नाव आहे. पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर ही महिला शिबू भौमिक नावाच्या व्यक्तीसोबत अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिप राहत होती. वरळीतील मायानगर परिसरात या महिलेचं वास्तव्य होतं.

वरळी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांच्या माहितीनुसार, परवा रात्री बाराच्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला कॉल आला. एक महिला बेशुद्ध अवस्थेत रक्ताने माखलेल्या अवस्थेत सापडली आहे, असं त्या फोनकॉलमध्ये सांगण्यात आलं होतं. यानंतर वरळीप पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांचं पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं आणि महिलेला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

महिलेला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. अतिशय क्रूरतेने महिलेची हत्या झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. एखाद्या कपड्याने तिचा गळा आवळण्यात आला. त्यानंतर आरोपीने चाकूने वार करुन तिचा चेहराही बिघडवला.

एवढंच नाही तर आरोपीने महिलेवर एखाद्या जड वस्तूने हल्ला केला, त्याच्या जखमाही डॉक्टरांना सापडल्या. यानंतर पोलिसांनी तिचा प्रियक म्हणजेच शिबू भौमिकविरोधात आयपीसीच्या कलम 302 (हत्या करण) अंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वरपे यांच्या माहितीनुसार, हत्येच्या एक दिवस आधीच शिबू भौमिक तिथून बाहेर गेला होता आणि त्यानंतरच ही हत्या केली. शिबू भौमिक हा वरळीमध्ये बांधकाम सुरु असलेल्या गगनचुंबी इमारतीत सुतारकाम करत असून सिखासोबत राहतो. सध्या आरोपी फरार असून पोलीस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेज बारकाईने तपासत आहेत. जेणेकरुन आरोपीचा शोध लावला जाईल.

 प्रतिनिधि – दिलीप सोनकांबळे

 

 
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp
Previous articleकाळ आला होता पण वेळ आली नव्हती! पुणे-सोलापूर महामार्गावर ट्रॅव्हल्स बसने घेतला अचानक पेट
Next articleवडगाव येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन