मुंबई | शबनम न्यूज
पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. पंचगंगा नदी प्रदूषणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व MIDC यांचे पथक संयुक्तरित्या नियमित देखरेख ठेवणार व दर महिन्याला अहवाल देणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सचिवालयामार्फत सुद्धा बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच पंचगंगा प्रदूषणाविरोधात शांततेने आवाज उठविणाऱ्या आंदोलकांवरील सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी माहिती मागवली आहे.
पंचगंगेतील प्रदूषणासाठी जबाबदार कंपन्यांना प्रथम टाळे ठोका आणि सर्व नियमांचे पालन केल्यानंतरच त्यांना युनिट सुरू करण्यास मान्यता द्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले.