पश्चिम महाराष्ट्र ओबीसी सेलचे काम प्रशंसनीय- जयंत पाटील

0
4
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

निरिक्षक सतीश दरेकर यांनी पक्षाध्यक्ष जयंत पाटील यांचेकडे केला अहवाल सादर

मुंबई / शबनम न्युज

पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलचे काम अत्यंत प्रशंसनिय असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले.
अगामी विधानसभांच्या दृष्टकोनातून पक्षांतर्गत बांधणीच्या दृष्टीने तसेच शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचतात कां? याच्या पाहणीसाठी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे यांनी राज्यात प्रभारी व निरिक्षक यांच्या नियुक्त्या करुन आढावा घेण्याची जबाबदारी सोपविली होती.

 

 

 

 

 

त्यानुसार पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी लतिफभाई तांबोळी व निरिक्षक पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतीश दरेकर यांनी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांचा दौरा करुन अहवाल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेकडे सुपूर्द केला. यावेळी ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी लतिफभाई तांबोळी व सतीश दरेकर उपस्थित होते.