#MANSOON : राज्यात पुढील दोन – तीन दिवस पावसाची शक्यता

0
15
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पुणे / शबनम न्युज

बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टय़ाची दिशा थेट महाराष्ट्रावर नसल्याने त्याचा राज्याच्या दृष्टीने प्रभाव क्षीण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यानच्या काळात राज्यात पुढील दोन ते तीन दिवसांच्या काळात मध्यम स्वरूपाचा, तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

 

 

 

 

२२ ऑक्टोबरला कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता  आहे.

आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड,मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा या भागात मुसळधार पाऊस होणार आहे. महाराष्ट्रात मात्र दोन ते तीन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील.