पर्यटन स्थळांवर फिजिकल डिस्टन्सिगचे उल्लंघन ; विनामास्क फिरणाऱ्या 2314 जणांवर कारवाई

0
16

लोणावळा / शबनम न्युज

पर्यटन बंदी उठविल्यानंतर शनिवार व रविवार लोणावळा मावळ तालुक्यात पर्यटक मोठ्या संख्येने दाखल झाले होते. पर्यटनाचा आनंद घेताना covid-19 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन शासन करत असताना देखील या नियमांचा भंग केल्याप्रकरणी मावळ तालुक्यात शनिवार व रविवारी 2314 जणांवर कारवाई करण्यात आली. अशी माहिती लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी दिली.

 

 

 

 

 

लोणावळा उपविभागाच्या अंतर्गत येणाऱ्या लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, कामशेत ,वडगाव पोलिसांनी ही कारवाई केली. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी 23 मार्च पासून सर्वत्र लॉक डाऊन करण्यात आला. होता सध्या सर्वत्र अनलॉक सुरू असल्याने सर्वत्र प्रवेश बंदी उठवली आहे. जिल्हाधिकारी पुणे यांनी मावळ तालुक्यातील पर्यटन बंदी उठविली आहे. यामुळे मागील शनिवार व रविवार मोठ्या संख्येने पर्यटक आले होते. मात्र, फिरताना अनेकांनी चेहऱ्यावर मास्क न लावल्याने तालुक्यात 801 फिजिकल डिस्टन्सिगच्या 169 आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 344 जणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी गर्दी न करता नियमांचे पालन करण्याचे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले आहे.