मुंबई / शबनम न्युज
येत्या तीन ते चार तासांत रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग या जिल्ह्यातील काही भागांमध्ये वीजांच्या कडकडाटासह मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई येथील विभागीय हवामान खात्याने दिली आहे.
Thunderstorm accompanied with lightning & moderate to intense spells of rain to occur at isolated places in the districts of Raigad Ratnagiri & Sindudurg during next 3-4 hrs
⛈️Activity likely to continue over Thane, Nasik, Pune Ahmednagar,Aurangabad,Nandurbar, Jalgaon & Kolhapur pic.twitter.com/fmQNRjBFh9— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 21, 2020
कोकणातील या जिल्ह्यांव्यतिरिक्त ठाणे, नाशिक, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नंदूरबार, जळगाव आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.