#PIMPRI : विद्यार्थ्यांचे उपोषण मागे घेण्यासाठी पोलिसांनी केली जोर जबरदस्ती – रयत विद्यार्थी परिषद

0
36
Facebook
Twitter
Pinterest
WhatsApp

पिंपरी / शबनम न्युज

महापालिकेच्या पिंपळे निलख येथील मैला शुद्धीकरण केंद्रातून विनाप्रक्रिया सांडपाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. याबाबत वारंवार पालिका प्रशासनाचे निदर्शनास आणूनही दुर्लक्ष केले जात आहे. याचा निषेध म्हणून रयत विद्यार्थी परिषद वतीने दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी रयत विध्यार्थी परिषद महाराष्ट्र राज्य यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी पिंपळे निळख येथील मैलशुद्धीकरण केंद्राबाबतच्या तक्रारीची दखल न घेतल्यामुळे आमरण उपोषणास बसलेले आहेत. तरी पोलिस अधिकारी मेजर जाधव उपोषणा कर्ता यांना जोरजबरदस्तीने उपोषण मागे घ्यायला लावत आहेत. उपोषण हे संविधनिक पध्दतीने चालु आहे मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरू राहणार आहे. असे रयत विद्यार्थी परिषद वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.

 

 

 

 

 

रयत विद्यार्थी परिषदेच्या मागण्या पुढीलप्रमाणे :-

1) पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्र पुर्ण क्षमतेने पिंपरी-चिंचवड महापालिकेने ठेकेदाराकडे भाडेतत्त्वावर न देता स्वत: पालिकेने चालवावा.
2)08/08/2020 पासून 08/10/2020 पर्यंत सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सांडपाणी नदीपात्रात सोडले यांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत.
3) श्री विनय इंजिनिअरिंग प्रा. ली या ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे.
4) पिंपळे निलख येथिल जलशुद्धीकरण केंद्रात असणारी बायपासची लाईन पुर्णपणे उखडून टाकावी.
5) या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी म्हणून पर्यावरण विभागाचे अभियंता संजय कुलकर्णी यांचे निलंबन करण्यात यावे.