#PUNE : आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिनाचे आयोजन

0
35
पुणे / शबनम न्युज
‘डॉ.पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स’ तर्फे २८ ऑकटोबर रोजी आंतरराष्ट्रीय ऍनिमेशन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.या दिवशी सकाळी ९ ते ११ या वेळात ऍनिमेशन,व्हिज्युएल इफेक्ट्स,गेमिंग,कॉमिक्स क्षेत्रातील आगामी दशकाबद्दल मान्यवरांचे  चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.या क्षेत्रातील मान्यवर त्यात सहभागी होणार आहेत.’डॉ.पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स’चे अधिष्ठाता डॉ ऋषी आचार्य यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
याच दिवशी कॅरॅक्टर डिझाईन अँड शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धांमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश आहे.स्पर्धांचा निकाल २८ ऑकटोबर रोजी  सायंकाळी ४ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.